‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहते. मात्र, काही मोजक्याच स्पर्धकांचे हे स्वप्न पूर्ण होते. नुकताच शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात अमिताभ एका स्पर्धकाला एक कोटी रुपयांचा प्रश्न विचारतात.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत अमिताभ हुसैन यांना पहिले ५० लाख रुपयांसाठी प्रश्न विचारतात. त्याचे उत्तर देत हुसैन ५० लाख रुपये जिंकतात. त्यानंतर हुसैन सांगतात की या जिंकलेल्या रक्कमेतून ते स्वत:चं घर घेणार आहेत. पुढे अमिताभ एक कोटी रुपयांसाठी १५ प्रश्न विचारतात.

आणखी वाचा : “त्या दिवशी बाळासाहेब नसते तर…”, अमिताभ यांनी केला होता खुलासा

आणखी वाचा : ‘कुंद्राला भेट…’, ब्रालेटमध्ये विमानतळावर पोहोचल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल

‘केबीसी १३’मध्ये, आता पर्यंत मध्ये प्रदेशचे गणित विषयाचे शिक्षक प्रांशु त्रिपाठी यांनी ५० लाख रुपये जिंकले. तर आग्राच्या शिक्षिका हिमानी बुंदेल या एकमेव अशा स्पर्धक आहेत, ज्यांनी १५ व्या प्रश्नाचे अचुक उत्तर देत १ कोटी रुपये जिंकले. आता हुसैन १ कोटी रुपये जिंकतील का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.