दिवसेंदिवस बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोपती’ पर्व ११ हा शो रंजक होत आहे. मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून पहिल्या जाणाऱ्या या शोमध्ये गांधी जयंती विशेष भाग प्रदर्शित करण्यात आला होता. शोमध्ये गांधीजींच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारे डॉ. बिंदेश्वर पाठक आणि इंदूरला देशातील स्वच्छ शहर बनवणारे महानगर पालिकेचे आयुक्त आशिष सिंह यांना स्पर्धक म्हणून बोलवण्यात आले होते. दरम्यान त्यांचा एक्सपर्टशी वाद झाला आहे.

गांधी जयंती विशेष भागामध्ये या दोन्ही स्पर्धकांना एका प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना एक्सपर्ट अॅडव्हाईस ही लाइफलाईन वापरावी लागली. दरम्यान त्यांना प्रसिद्ध टीव्ही अॅंकर रोहीत सरदाना यांची एक्सपर्ट म्हणून मदत घ्यावी लागली. मात्र रोहित यांनी आयुक्त आशिष सिंह यांची मदत करताना त्यांना टोमणादेखील मारला.

‘उपन्यास चंद्रकांता कोणत्या भाषेत लिहिण्यात आला आहे’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याचे योग्य उत्तर ‘हिंदी’ असे होते. मात्र रोहित यांनी स्पर्धकांची मदत करताना ‘मला वाटले आशिषजींनी चंद्रकांता ही मालिका पाहिली असेल. कारण त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये फार अंतर नाही’ असे म्हटले. प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यानंतर आशिष यांनी एक्सपर्टचे आभार मानण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांनी सांगितलं त्यांच्या आडनावामागील सिक्रेट

खेळ संपल्यावर आशिष यांनी बिंदेश्वर यांना जिंकेलेली रक्कम इंदूर शहराच्या विकासाठी देण्याची विनंती देखील केली. दरम्यान आशिष यांनी त्यांचा इंदूरला स्वच्छ शहर बनवताचा अनुभव शेअर केला.