‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक कलाकारांना या गाण्याची भुरळ पडली. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध रील स्टार किली पॉललाही ‘नाटू नाटू’ या गाण्याने वेड लावलं आहे. नुकतंच त्याने या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने या गाण्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किली पॉल दक्षिण आफ्रिकेच्या तंजानियामधील एक प्रसिद्ध रील स्टार आहे. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स पाहायला मिळतात. किली पॉल अनेक भारतीय गाण्यावर रील बनवताना पाहायला मिळते. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. नुकतंच त्याने ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर रिल केला आहे.
आणखी वाचा : Oscar Awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताची ऐतिहासिक कामगिरी, दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले

किली पॉलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्याने ‘नाटू नाटू’ गाण्याची हुकस्टेप जशीच्या तशी कॉपी केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या धम्माल गाण्याचा व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहे. “प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण. थोडासा उशीरच झाला. पण तरीही ‘नाटू नाटू’ च्या संपूर्ण टीमचे ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : “एका विशिष्ट भाषेतील चित्रपटसृष्टी…” ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर अमोल कोल्हेंचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

दरम्यान कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. ऑस्कर २०२३मध्ये भारताने दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही ऑस्कर पटकावला. ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आता विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे कौतुक केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kill paul dance rrr movie naatu naatu oscars 2023 winning song see video nrp
First published on: 30-03-2023 at 15:25 IST