अभिनेत्री करिना कपूर खानच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीमध्ये सुरू आहे. या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर, शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सेटवर सोनम आणि करिनाची चांगलीच मैत्री जमली आहे. दोघींचे काही सेल्फी आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या दोघींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधतोय. या व्हिडिओमध्ये बेबोने सोनमबद्दल एक खुलासा आहे, ज्यामुळे ती नाराज झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करिनाच्या एका इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. बेबो, सोनम आणि सोनमची बहिण रिया एकमेकांशी गप्पा मारत आहेत. या गप्पांदरम्यान रियाने सोनमला गोड पदार्थांविषयी बोलण्यास सांगितलं. त्यावर ‘कॅलरीज नसायला पाहिजे,’ असं उत्तर सोनमनं दिलं. या उत्तरानंतर मात्र लगेच बेबोने खुलासा केला की, ‘ती गोड पदार्थ खाणार नाही कारण तिने आताच भरपूर बटाट्यांचे चिप्स खाल्ले आहेत.’ यामुळेच सोनम बेबोवर नाराज झाली आहे. अर्थात या तिघींमध्ये ही थट्टामस्करी सुरू होती. ही ऑफस्क्रीन मस्ती पाहिल्यानंतर आता पडद्यावर ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा : टॉम अल्टर यांनी केली होती धोनीवर बंदी आणण्याची मागणी

शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटात एका लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या चार मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. सुरुवातीला चित्रपटासाठी कतरिना कैफ आणि हुमा कुरेशी यांनाही विचारण्यात आलं होतं. मात्र, काही कारणांमुळे या दोघींनी नकार दिला होता. सोनम कपूरची बहिण रिया कपूर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची निर्माती असून वेब सीरीजमधून प्रसिद्धीस आलेला अभिनेता सुमित व्यासदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why sonam kapoor is unhappy with kareena kapoor
First published on: 02-10-2017 at 15:14 IST