‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. यामध्ये कोंडाजी बाबा म्हणजेच कोंडाजी फर्जंद यांची भूमिका अभिनेते आनंद काळे यांनी केली होती. या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं कारण तशा ताकदीने त्यांनी भूमिका साकारली होती. आनंद काळे खऱ्या आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेऊयात.

आनंद यांचा जन्म २ सप्टेंबर १९७२ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांनी शिक्षणसुद्धा कोल्हापुरातच घेतलं. महाविद्यालयात असताना फुटबॉलवर त्यांचं विशेष प्रेम होतं. तर फावल्या वेळेत फोटोग्राफी करण्यास ते पसंती देतात. सध्या आनंद काळे हे मुंबईत राहतात.

आणखी वाचा : झी मराठी अवॉर्ड्स २०१९ : कलाकारांचा अनोखा अंदाज

‘चार दिवस सासूचे’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी आठ वर्षे काम केलं. मालिकेत त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती व दिग्दर्शनातही रस आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘पी से पीएम तक’ या चित्रपटात ते झळकले होते. तर मराठीतील ‘वहिनीसाहेब’, ‘जिवलगा’, ‘वृंदावर’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. हिंदीमध्ये ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी, मराठीसोबतच त्यांनी ‘रिमेम्बर अॅम्नेशिया’ या इंग्रजी चित्रपटातही काम केलं आहे. ‘महालक्ष्मी सिने सर्व्हिस’ ही निर्मिती कंपनी त्यांनी सुरू केली असून त्या माध्यमातून ते मालिका व वेब सीरिजची निर्मिती करतात.