मला अनू मलिकचा बदला घ्यायचा…; कुमार सानूचा मोठा खुलासा

नुकताच एका कार्यक्रमात कुमार सानू यांनी वक्तव्य केले आहे.

Kumar Sanu,Anu Malik,yeh kaali kaali aankhein,Sa Re Ga Ma Pa,baazigar,

९०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय गायक म्हणून कुमार सानू आणि अनू मलिक ओळखले जातात. त्यांची गाणी त्यावेळी सुपरहिट ठरली होती. त्यांची गाणी आजही चाहते आनंदान ऐकत असतात. पण एका कार्यक्रमात कुमार सानू यांनी मला अनू मलिकचा बदला घ्यायचा आहे असे म्हटले. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

नुकताच कुमार सानू यांनी ‘सा रे ग म प’ या गाण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी ‘बाजीगर’ चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘ये काली काली आंखे’च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या गाण्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मला अनू मलिकचा बदला घ्यायचा आहे. मला त्यांनी या गाण्यातील रॅपवाला भाग गाऊ दिला नाही. त्यांनी स्वत: तो गायिला.’
आणखी वाचा :खुशखबर! सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ प्रदर्शित होणार हिंदीमध्ये

पुढे ते म्हणाले, ‘मी अगदी सहज ते गाऊ शकत होतो. पण तरीही त्यांनी मला ते गाऊ दिले नाही. तेव्हा पासून मी नेहमी म्हणत असे की हा रॅपवाला भागा मी गाऊन अनू मलिकचा बदला घेणार. आज या कार्यक्रमात येऊन मी बदला घेतला आहे.’

कुमार सानू यांनी ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमात हजेरी लावली. झी वाहिनीने कार्यक्रमाचा प्रोमो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kumar sanu always wanted to take revenge on anu malik for doing this during baazigar avb