मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी मालिकांमध्येही काम करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आली आहे. ‘झी टिव्ही’ वाहिनीवरील ‘कुमकुम भाग्य’ या हिंदी मालिकेत काम करणारी मृणाल तिचा सहकलाकार अर्जित तनेजा याला डेट करत असल्याचे म्हटले जातेय. या मालिकेत हे दोघंजण बुलबुल आणि पूरब या पात्रांच्या भूमिका साकारत होते. ही मालिका सोडल्यानंतर दोघंही इंडोनेशियामध्ये एका कार्यक्रमासाठी चित्रीकरणाला गेलेले.

वाचा : अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या पोस्टने महापालिका प्रशासन खडबडून जागे

अर्जित आणि मृणाल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा असून, इंडोनेशियामध्ये चित्रीकरण करत असताना त्यांच्यातील जवळीक वाढल्याचे म्हटले जाते. याआधी मृणाल ही लेखक शरद चंद्र त्रिपाठी याला डेट करत होती. या दोघांनी नच बलिये दरम्यान त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण, दोघांचेही कुटुंब त्यांच्या प्रेमाच्या विरोधात असल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला, अशा चर्चा होत्या.
एका संकेतस्थळाने शरद त्रिपाठीशी संवाद साधला असता तो म्हणाला की, मी आणि मृणाल अजूनही एकत्र आहोत. तिच्याबद्दल होत असलेल्या चर्चा खोट्या आहेत. मृणाल आणि माझ्या प्रेमाला आमच्या कुटुंबाचा विरोध असल्याचे सर्वांनाच माहित आहे. मृणाल सध्या इंडोनेशियामध्ये चित्रीकरण करत आहे. केवळ आम्ही एकमेकांपासून सध्या दूर आहोत किंवा एकमेकांसोबतचे फोटो आमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत नाही याचा अर्थ आमचा ब्रेक अप झालाय असा होत नाही, असेही शरद म्हणाला. दुसरीकडे अर्जितला त्याच्याबद्दलच्या या चर्चा कळताच त्याला यावर केवळ हसू आले.

वाचा : Movie Review अडखळणारा तरीही मनं जिंकणारा ‘जग्गा जासूस’

‘हॅलो नंदन’, ‘सुराज्य’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये मृणालने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

17587252_549587621832326_3283481190459244544_n

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृणाल ठाकूर, अर्जित तनेजा