गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतीय संगीत क्षेत्रातील स्वर-चमत्कारच म्हणावं लागेल. गेली आठ दशकं त्या आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आज वयाच्या ९१ व्या वर्षी देखील त्या सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. नुकतेच त्यांनी रेडिओवर गायलेल्या आपल्या पहिल्या गाण्याची आठवण चाहत्यांना सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – हे घर आहे की शहर… पाहा मायकल जॅक्सनचं अब्जावधींचं घर

“१६ डिसेंबर १९४१ साली मी माझ्या कारकिर्दीतील रेडिओवरील पहिलं गाणं गायलं होतं. आज या घटनेला ७९ वर्ष पुर्ण झाली आहेत. मी दोन न्याट्यगीत गायले होते. जेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओवरील माझा आवाज ऐकला तेव्हा ते खूप खुष झाले होते. ही आनंदाची बातमी त्यांनी माझ्या आईला देखील सांगितली होती. आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं होतं.” अशा आशयाचं ट्विट करत लता मंगेशकर यांनी आपल्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्षे वेधून घेत आहे. जगभरातील हजारो चाहत्यांनी या गाण्यासाठी त्यांचे कौतुक केलं आहे.

अवश्य पाहा – गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती; पोलिसांनी केली अटक

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर १९४५ मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar first song on radio mppg
First published on: 16-12-2020 at 13:33 IST