चिरंजीवीची पत्नी मेघना राजने केला मुलाच्या नावाचा खुलासा, म्हणाली…

तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मुलाच्या नावाची घोषणा केली आहे.

Sandalwood News, raayan raj sarja, naming, meghana raj, Kannada Movies News, Chiranjeev Sarja,

ऑक्टोबर २०२०मध्ये दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी मेघना राजने एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर मेघना बाळाचे नाव काय ठेवणार अशा चर्चा रंगल्या होत्या. काहींनी प्रिंस, सिम्बा, ज्यूनिअर चिरु अशी अनेक नावे मेघनाला सुचवली होती. आता चिरंजीवी सरजाच्या कुटुंबीयांनी मुलाच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

शुक्रवारी मेघनाने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत मुलाचे नाव काय ठेवले याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्ही मुलाचे नाव रेयान राज सरजा असे ठेवले आहे. रेयानचे दोन अर्थ होतात. एक राजकुमार आणि दुसरा स्वर्ग. रेयानच्या येण्याने आमच्या सर्वांचे आयुष्य बदलले आहे, आनंदी झालो आहोत’ असे मेघना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj)

पुढे ती म्हणाली, ‘मला आतापर्यंत सर्वात जास्त कोणता विचारण्यात आला असेल तर तो म्हणजे मुलाचे नाव काय ठेवले? मला आनंद आहे की आम्ही आता मुलाचे नाव ठेवले आहे. आता आम्ही केकवर त्याचे नाव लिहू शकते.’

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजाचे ७ जून २०२० रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने त्याची पत्नी मेघना राजला मोठा धक्काच बसला. त्यानंतर काही दिवसांनी मेघना गरोदर असल्याचे समोर आले. आता मेघनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव रेयान ठेवल्याचे समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Late actor chiranjeevi sarja wife meghana raj sarja reveals son name raayan raj sarja avb

ताज्या बातम्या