हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो दीकॅप्रिओ याने न्यूयॉर्क शहरात तब्बल १० दशलक्ष डॉलर्समध्ये अलिशान सोयी-सुविधांनी सज्ज अशा सदनिकेची खरेदी केली आहे. दोन बेडरूमचा समावेश असलेल्या या सदनिकेत अत्यंत उच्च दर्जाच्या आणि महागड्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सदनिकेच्या परिसरात सतत शुद्ध हवेचा आणि पाण्याचा पुरवठा होत राहिल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसाधनगृहात असणाऱ्या अंघोळीच्या शॉवरमधील पाण्यातून शरीराला ‘क’ जीवनसत्वाचा पुरवठा होईल अशा एक ना अनेक सुसज्ज सेवा देण्यात आल्या आहेत.
लिओनार्डो दीकॅप्रिओ सध्या त्याची प्रेयसी टोनी ग्रॅम हिच्याबरोबर न्यूयॉर्कमध्येच वास्तव्याला आहे. सुत्रांच्या माहितीनूसार लिओनार्डो आणि टोनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. मात्र या दोघांच्या जवळच्या वर्तुळातील लोकांनी लिओनार्डो दीकॅप्रिओने अशाप्रकारचे कोणतेही घर खरेदी केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2014 रोजी प्रकाशित
लिओनार्डो दीकॅप्रिओच्या न्यूयॉर्कमधील घराची किंमत १० दशलक्ष डॉलर्स
हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो दीकॅप्रिओ याने न्यूयॉर्क शहरात तब्बल १० दशलक्ष डॉलर्समध्ये अलिशान सोयी-सुविधांनी सज्ज अशा सदनिकेची खरेदी केली आहे.

First published on: 08-05-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leonardo dicaprio buys usd 10 million apartment