Video : ‘पांडू’ आणि ‘महादू’शी दिलखुलास गप्पा

लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये पांडू चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली.

विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम व कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत असलेला ‘पांडू’ हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी शूटिंगचे काही भन्नाट किस्से आणि खऱ्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. ‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. हा चित्रपट आज, ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta digital adda pandu movie team bhau kadam kushal badrike avb