उत्तम अभिनयशैली आणि मनमोहक नृत्यकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. या लॉकडाउनच्या काळात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी इन्स्टाग्रामवर अनेक वेळा व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते. अलिकडेच माधुरीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या फोटोपेक्षा माधुरीने दिलेलं कॅप्शन अनेकांच लक्ष वेधत आहे.
माधुरीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन म्हणून एक शायरी जोडली आहे. ज्यामुळे अनेकांचं लक्ष या फोटोकडे वेधलं जात आहे. “लाकर थोड़ी सी खुशी अपने चेहरे पर, हमने खुद को दूसरों से अलग बना लिया, लोग ढूंढ़ते रहे मुस्कुराने का कारण, हमने दूसरों की खुशी को अपना बना लिया,” असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान,लॉकडाउनचा कालावधी सुरु असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच माधुरीदेखील घरीच आहे. अलिकडेच ती कलंक आणि टोटल धमाल या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती डान्स दिवाने या रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकणार आहे.