२१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐतिहासिक ‘महाभारत’ ही मालिका पाहता येत आहे. २८ मार्चपासून दुपारी १२ व संध्याकाळी सात वाजता ही मालिका डीडी भारतीवर प्रसारित केली जात आहे. छोट्या पडद्यावरील ही सर्वोत्तम मालिका समजली जायची. टीआरपीचे सर्व विक्रम या मालिकेने मोडले. केवळ भारतातच नाही तर युके आणि इतर देशांमध्येही ही मालिका लोकप्रिय होती. मात्र या मालिकेतील कलाकारांना त्यावेळी किती मानधन मिळायचे, माहित आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टेलीचक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘महाभारत’च्या संपूर्ण स्टारकास्टला एका एपिसोडसाठी फक्त तीन हजार रुपये मानधन मिळायचे. या मालिकेतील बहुतांश कलाकार हे नवोदित असल्याने त्यांचं मानधन समानच ठेवण्यात आलं होतं. ही रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल कारण आताच्या मालिकेतील कलाकार कोट्यवधींमध्ये कमाई करतात. छोट्या कलाकारांनाही आता लाखभर रुपये मानधन मिळतं. मात्र त्यावेळी एका एपिसोडसाठी तीन हजार रुपये ही रक्कम काही छोटी नव्हती.

पाहा फोटो : सोनाली कुलकर्णी ते रिंकू राजगुरू; विनामेकअप अशा दिसतात मराठी तारका

‘महाभारत’ मालिकेची स्टारकास्ट फार तगडी होती. यातील पुनीत इस्सरसारख्या कलाकारांनी आधीच नाव कमावलं होतं तर मुकेश खन्नासारखे अभिनेते नंतर प्रकाशझोतात आले. ‘महाभारत’ ही संपूर्ण मालिका बनवण्यासाठी जवळपास ९ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharat star cast pay was very low ssv
First published on: 25-04-2020 at 13:27 IST