सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे कार्यक्रमामधील काही विनोदवीरांचं तर नशिबच बदललं. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे दत्ता मोरे म्हणजेच सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे. दत्तूच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला आणि त्यामुळे तो अगदी भारावून गेला आहे.

आणखी वाचा – Photos : अमृता फडणवीस यांचा नवा लूक, लंडन दौऱ्यादरम्यान केलं खास फोटोशूट

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

दत्तूचा सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला. दत्तू ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत लहानाचा मोठा झाला. त्याच्या चाळीतील मंडळींना तसेच ठाणेकरांना दत्तूचा खूप अभिमान वाटतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे दत्तू राहत असलेल्या चाळीला ‘दत्तू चाळ’ असं नाव देण्यात आलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दत्तूने हा संपूर्ण प्रसंग सांगितला. या गोष्टीमुळे दत्तू खूपच भारावून गेला आहे.

“मी राहत असलेल्या चाळीला याआधी कोणतंच नाव नव्हतं. चाळ कुठे आहे हे सांगायचं झालं तर आजूबाजूला असलेल्या एखाद्या ठिकाणावरुन ते सांगावं लागायचं. पण आता हिच चाळ माझ्या नावाने ओळखली जाणार असल्याचं ऐकून खूप छान वाटत आहे.” असं दत्तू याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. शिवाय त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमचे आभार देखील मानले.

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

दत्तू म्हणाला, “माझ्यासाठी खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या नगरातील खासकरुन चाळीतल्या लोकांचं माझ्यावर वेगळंच प्रेम आहे. या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन, ज्यांनी आजपर्यंत मला एवढं प्रेम दिलं, कौतुकाची थाप दिली त्यांनी असंच प्रेम करत राहा. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच उर्जा मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कुटुंबाचा, सोनी मराठी वाहिनीचे मी यासाठी आभार मानतो.” दत्तूच्या कामाची ही पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही.