scorecardresearch

करीना, अमृता पाठोपाठ महिप कपूर आणि सीमा खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह

महिप कपूर, सीमा खान, करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी एकत्र करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती

maheep kapoor covid,seema khan covid,kareena kapoor covid,covid 19,maheep kapoor,kareena kapoor,seema khan,covid 19 cases in india,covid 19 cases in mumbai,Amrita Arora,

करोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. अशातच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोराची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक पार्ट्यांना देखील हजेरी लावली होती. आता त्यांच्यापाठोपाठ महिप कपूर आणि सीमा खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महिप कपूर ही ज्वेलरी डिझायनर आहे. तिने संजय कपूरशी लग्न केले आहे. तर सीमा खान ही फॅशन डिझायनर आहे. त्या दोघीही नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये दिसल्या होत्या. संजय कपूरने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की,’हो.. तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिला करोनाची लक्षणे जाणवू लागली होती. तिने स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे.’
आणखी वाचा : करीना कपूर खान आणि अमृता अरोरा करोना पॉझिटिव्ह, अनेक पार्ट्यांना लावली होती हजेरी

महिप कपूर, सीमा खान, करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी एकत्र करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीला मलायका अरोरा, आलिया भट्ट आणि अर्जुन कपूरने देखील हजेरी लावली होती.

करोना नियमांचं उल्लंघन करून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित राहिल्यामुळेच करीना आणि अमृता यांना करोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींमुळे अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता त्यांच्या पाठोपाठ महिप कपूर आणि सीमा खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maheep kapoor and seema khan test positive for covid 19 after kareena amrita avb

ताज्या बातम्या