दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबूचे लाखो चाहते आहेत. चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाती आतुरतेने वाट पाहत असतात. आता लवकरच महेश बाबू ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटात दिसणार आहे. पण सगळ्यांचे लक्ष हे त्याच्या मुलीने वेधले आहे.

एकीकडे स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे तसचं आता दाक्षिणात्य चित्रपटात पाहायला मिळतं आहे. महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची १० वर्षांची लेक सिताराच्या डेब्यूने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सिताराने वडील महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत एण्ट्री केली आहे. चित्रपटातील पेनी (Penny) या गाण्यात ती दिसली आहे.

आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…

आणखी वाचा : या ३ अक्षराच्या मुली असतात भाग्यवान, लग्नानंतर ज्या घरात जातील तिथे होईल धनवर्षाव

महेश बाबूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. महेशने ट्विटर अकाऊंटवरून पेनी गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. यात सितारा डान्स करत असल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये सितारा आणि महेश बाबू हुक स्टेप करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : The Kashmir Files: “मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे…”, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले सत्य

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी काजोल होणार तिसऱ्या बाळाची आई? या VIRAL VIDEO वरून चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सिताराचा जन्म २० जुलै २०१२ रोजी झाला होता. नम्रता २००० मध्ये महेश बाबूला भेटली होती. ‘वामसी’ चित्रपटाच्या सेटवर दोघे प्रेमात पडले आणि त्यानंतर १० फेब्रुवारी २००५ रोजी त्यांनी लग्न केले. महेश बाबू आणि नम्रता यांना एक मुलगा असून त्याचे नाव गौतम कृष्णा आहे.