सुपरस्टार विजय सेतुपतीच्या आगामी ‘विदुथलाई’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मोठा अपघात घडला आहे.वंदलूरमध्ये ‘विदुथलाई’ चित्रपटाचे शूटींग सुरु असताना २० फुटांवरुन खाली कोसळून एका स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. स्टंट मास्टर एस सुरेश असे त्यांचे नाव असून ते ५४ वर्षांचे होते. या घटनेनंतर सर्वांनाचा धक्का बसला आहे.

मीडिया रिपोर्टसनुसार, स्टंट मास्टर एस सुरेश यांना एका अ‍ॅक्शन सीनचे शूटींग करायचे होते. या अ‍ॅक्शन सीनमध्ये त्यांना २० फूट उंचीवरुन उडी मारायची होती. ते हा स्टंट करण्यासाठी गेले असता त्यांना सुरक्षिततेसाठी क्रेनच्या दोरीने बांधण्यात आले होते. मात्र दुर्देवाने ही दोरी तुटली आणि ते खाली पडले. या दुर्घटनेनंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात कसा घडला याचा तपासही पोलिसांनी सुरु केला. मात्र अद्याप पोलिसांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

सुरेश हे गेल्या २५ वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत होते. सिनेसृष्टीत दाखल झाल्यापासून त्यांनी स्टंटमॅन म्हणूनच स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मात्र स्टंट करताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज

‘विदुथलाई’ या चित्रपटात सुरीबरोबर विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटींग दोन भागात केले जाणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचं शूटींग पूर्ण झाले आहे. सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटींग सुरु होते. मात्र अपघातामुळे हे शूटींग सध्या थांबवण्यात आले आहे.

‘विदुथलाई’ या चित्रपटात विजय सेतुपती हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. ज्यात तो सुरीला मार्गदर्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट क्राईम-थ्रिलर स्वरुपात असणार आहे. या चित्रपटात सुरी, विजय यांच्याबरोबर प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भवानी श्री, राजीव मेनन, चेतन हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटातील बहुतांश सीन सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आले आहेत.