बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लूकमुळे आणि सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे कायम चर्चेत असते. मलायकाचा कलाविश्वात पूर्वीसारखा फारसा वावर राहिलेला नाही. मात्र तरीदेखील बॉलिवूडमध्ये कायम तिच्या नावाची चर्चा सुरु असते. अलिकडेच मलायकाने एका कार्यक्रमामध्ये तिच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने तिच्या प्रेग्नंसी काळातील काही आठवणींनाही उजाळा दिला.काही दिवसापूर्वी मलायकाने अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या प्रेग्नंसी काळातील अनेक आठवणी सांगितल्या.
“माझा पूर्वीपासून कलाविश्वामध्ये उत्तम वावर आहे. त्यामुळे प्रेग्नंसी काळातही मी काम केलं. इतकंच नाही तर माझ्या बाळाचा जन्म झाल्यावर लगेच ४० दिवसांनंतर मी काम करण्यास सुरुवात केली. तसंच करिअरच्या सुरुवातीला माझ्या सावळ्या रंगामुळे मला कलाविश्वामध्ये दुजाभाव मिळाला होता”,असं मलायकाने सांगितलं.
दरम्यान, मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली. त्यानंतर ती अनेक गाण्यांमध्ये किंवा म्युझिक अल्बममध्ये झळकली. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरमुळे चर्चेत येत आहे. नेहाच्याच चॅट शोमध्ये तिने तिच्या ड्रीम वेडिंगविषयीही अनेक गोष्टी सांगितल्या.