‘मन उडू उडू झालं’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता खूप होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे. आता या मालिकेतील कलाकारांनी हॉट-एअर बलूनची सैर केली आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील दोन्हीही कलाकार हॉट एअर बलून सैरसाठी अगदी उत्सुक होते आणि त्यांनी याचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच या हॉट-एअर बलूनमध्ये मालिकेचे काही सीन देखील चित्रित करण्यात आले आहेत जे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील. त्यामुळे हा वेगळा अनुभव टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other
RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

याबद्दल बोलताना हृता म्हणाली, “मला अजूनही विश्वास बसत नाही आहे कि आम्ही अशी अॅक्टिव्हिटी केली हे माझ्या कल्पेने पलीकडचं होतं. मन उडू उडू झालं म्हणत आम्ही खरोखरच उडतोय.”

या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, “मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षक खूप उदंड प्रतिसाद देत आहेत याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. उडू उडू या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि ही अॅक्टिव्हिटी देखील त्याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत राहावं आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेतेय असं म्हणेन.”