'बँड बाजा बारात'चा दिग्दर्शक मनिष शर्मा याने त्याचा तिसरा रोमँटीक कॉमेडी चित्रपट 'शुध्द देशी रोमान्स'च्या दिग्दर्शनाची तयारी सुरू केली आहे. यशराज फिल्मसच्या बॅनरखाली 'शुध्द देशी रोमान्स' चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. 'काय पो चे' मधील अभिनेता सुशांत राजपूत आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री परिणीती चोप्रा 'शुध्द देशी रोमान्स' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. परिणीती सोबत बॉलिवूडमध्ये 'शुध्द देशी रोमान्स'मधून पदार्पण करत असलेली वाणी कपूर व ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर देखील महत्वाच्या व्यक्तीरेखा साकारणार आहेत. जयदिप साहनी यांनी 'शुध्द देशी रोमान्स'ची पटकथा लिहिली आहे व आदित्य चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.