‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाची प्रचंड क्रेझ आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे सुद्धा सर्वत्र लोकप्रिय झाला. मात्र, सध्या तो हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वीच गौरवने हास्यजत्रेतून एक्झिट घेतली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता गौरव हिंदी प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भर कार्यक्रमात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिला इम्प्रेस केलं होतं. आता नुकतीच या शोमध्ये ‘मर्डर’ फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने उपस्थिती लावली होती. याचा नवीन प्रोमो वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून नुकताच शेअर करण्यात आला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic dance on chaar kadam Song
Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माच्या ‘या’ गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Kaumudi Walokar
Video : मराठी अभिनेत्री कौमुदी वलोकरने शेअर केला लग्नातील अनसीन व्हिडीओ; म्हणाली….
bigg boss 18 actor shalin bhanot first time talk about dating rumours with eisha singh
Video: “माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर…”, अखेर शालीन भनोटने ईशा सिंहबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला…

हेही वाचा : “मी गरोदर नाही”, ‘टाईमपास ३’ फेम अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार; म्हणाली, “माझ्या गर्भाशयात…”

मल्लिका तिच्या डान्सिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. ती मंचावर येताच गौरवर तिला मजेशीर बेली डान्स करून इम्प्रेस केलं. मल्लिकाचं ‘गुरु’ चित्रपटातील “माय्या माय्या…” गाणं प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या गाण्यात तिने बेली डान्स करून सर्वांनाच भुरळ घातली होती. याच गाण्यावर गौरव काहीशा मजेशीर अंदाजात थिरकल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video : लाडक्या मैत्रिणीसाठी सई ताम्हणकर झाली हेअर स्टायलिस्ट! प्रिया बापट म्हणते, “माझी सुपरस्टार…”

मल्लिका सुद्धा त्याचा कॉमेडी अंदाज पाहून चांगलीच इम्प्रेस झाली. “मी आजवर “माय्या माय्या…” गाण्यावर अनेकांना डान्स करताना पाहिलंय. पण, हे सगळ्यात जबरदस्त व्हर्जन आहे.” असं म्हणत तिने सर्वांसमोर गौरव मोरेचं कौतुक केलं. त्याच्या डान्स पाहून मल्लिका थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video: “नातेवाईकांना पैसे दिले म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही,” घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून संतापला शशांक केतकर, म्हणाला…

‘मॅडनेस मचाएंगे’च्या नव्या प्रोमोवर गौरवच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव केला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हा लोकप्रिय अभिनेता हिंदी कलाविश्वात आपली छाप पाडत असल्याने त्याचे चाहते आनंदी आहेत. त्याच्याशिवाय या कार्यक्रमात हेमांगी कवी, कुशल बद्रिके हे मराठी कलाकार सुद्धा आहेत. मल्लिका शेरावत पाहुणी म्हणून हजेरी लावणार असल्याचा हा विशेष भाग येत्या शनिवार-रविवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

Story img Loader