हृतिक-यामीच्या ‘काबिल’मध्ये गिरीश कुलकर्णी!

‘काबिल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात केली आहे.

मराठी अभिनेता, निर्माता आणि लेखक गिरीश कुलकर्णी सध्या बरेच व्यस्त आहेत. गिरीश हे ‘जाउ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटाद्वारे आता दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. सध्या याचं चित्रपटाच्या कामात ते व्यस्त आहेत. त्याचसोबत त्यांनी आता हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काबिल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात केली आहे.
टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले असून गिरीश म्हणाले की, आम्ही चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे आणि अजून दोन-तीन महिने हे चित्रीकरण सुरु राहिल. नकारात्मक छटा असलेली व्यक्तिरेखा मी ‘काबिल’मध्ये साकारतोय.
संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच अभिनेता हृतिक रोशनने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actor girish kulkarni in hrithik yami starrer kaabil

ताज्या बातम्या