‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रमुख भूमिका असलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या दोघांनी चित्रपटाच्या सेटवर नखरे कोण करायचं यावर बोलले आहेत.

‘सरला एक कोटी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या सेटवरील गंमतीजमती सांगितल्या आहेत. he or she असा सेगमेंट या कार्यक्रमात होता ज्यात काही प्रश्न विचारले जाणार होते तेव्हा त्यांनी याचे he or she मध्ये उत्तर द्यायचे होते.

‘सरला एक कोटी’ चित्रपटातील अनुभवावर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया; म्हणाला, “माझे मित्र ईशाबद्दल….”

या दोघांना प्रश्न विचारण्यात आला की “तुमच्यात खवैय्या कोण आहे?” त्यावर दोघांनी “she” हे उत्तर दिले. तसेच पुढचा प्रश्न विचारला की “तुमच्यात हुशार कोण आहे?” त्यावर लगेचच दोघानी “he” उत्तर दिले. पुढचा प्रश्न होता तो म्हणजे “चित्रपटाच्या सेटवर कोणाचे नखरे जास्त असायचे” यावर दोघांची उत्तर सारखी होती ती म्हणजे he, ईशाने ओंकारकडे बोट दाखवले यावर ओंकार म्हणाला “याच माझ्याकडे उत्तर नाही पण मला जर पटलं नाही तर मला जुळवून घेता येत नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

…म्हणून मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून बाहेर पडलो; अखेर ओंकार भोजनेचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे.