वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्त्सवाची रंगत वेगळीच आहे. मात्र या गणेश जयंतीच्या निमित्ताने तोच उत्साह जल्लोष पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळते. याच उत्साही वातावरणाची पुन्हा आठवण होण्यामागचं विशेष कारण म्हणजे प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सिनेमा ‘मेमरी कार्ड’. संजय खापरे याचा सहभाग असणाऱ्या या सिनेमाविषयी खुद्द त्यानेच अधिक माहिती देत बाप्पावर असणारी आपली श्रद्धा सर्वांसमोर आणली. या सिनेमाविषयी अधिक माहिती देत संजय म्हणाला, ‘या सिनेमाची कथा सुरु होताच पहिल्याच दृश्यात मी बाप्पांची आरती करताना दिसतो.’ निर्सगरम्य वातारणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार कोकणातील गणेशोत्सव या सिनेमाच्या निम्मिताने आम्ही साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली, असेही तो आवर्जून सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शिवडीत माझं बालपण गेलं. सणावारांच ते भन्नाट वातारण स्वतः पाहिल्यामुळे मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं आहे. माझ्या बाबा आणि काकांना कलेची आवड असल्यामुळे गणपतीची सजावट, मखर यासारख्या गोष्टी ते स्वतःहून बनवायचे. त्यांचे हे गुण आम्हा भावंडांमध्ये ओघाओघाने आलेच. कॉलेजच्या दिवसात आम्ही देखील हा कित्ता पुढे गिरवला. आईच्या हातचे मालपोहे आणि बाबांसोबत घालवलेल्या त्या दिवसांचा आनंद काही वेगळाच होता. मुळात गणेशोत्सवाप्रती माझ्या मनात प्रचंड आत्मियता होती आणि आहे. चिपळूणला आमच्या मूळगावी नाटक सिनेमाच्या दौऱ्यानिमित्त मी गणेशोत्त्सवाच्या दिवसांमध्ये नेहमी फेरी मारायचो.

वाचा : ‘बंदीच्या कचाट्यातून ‘पद्मावत’ सुटला, मला आनंद झाला’

एकदा मात्र ‘गोपाळ रे गोपाळा’ नाटकाच्या निमित्ताने गोव्याला गेलो असता त्या वर्षीचा गणेशोत्त्सव चुकतो की अशी भीती होती पण, मानगावच्या जवळ आलं असता तिथून जाताना गणपतीची मिरवणूक दिसली आणि आम्ही सगळे एकमताने निर्णय घेत त्या गणपती विर्सजनाच्या मिरवणुकीत सहभागी झालो. मुख्य म्हणजे आमचा गणेशोत्सव चुकला नव्हता. अशा अनेक आठवणींनी भरलेलं ‘मेमरी कार्ड’ नेहमीच जपून ठेवलं पाहिजे, असं त्याने न विसरता सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sanjay khapare movie ganapati
First published on: 20-01-2018 at 17:37 IST