विविध दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनी येत्या १० सप्टेंबरपासून नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा धिंगाणा असणार आहे. जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि विसाव्याचे काही क्षण मिळतात तेव्हा अंताक्षरी रंगल्याशिवाय राहत नाही. स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या या नव्या कार्यक्रमातही मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितिक लढत रंगणार आहे. पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर यात बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमती उलगडणार आहेत. याचे दोन प्रोमोही समोर आले आहे.
आणखी वाचा : ‘लेकीला बापाचे कौतुक फार…’ पुरस्कार मिळाल्यानंतर सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ जाधव छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. तब्बल ११ वर्षांनंतर तो स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडला जातोय. “या कार्यक्रमासाठी तो अतिशय उत्सुक आहे. मी अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाची वाट पहात होतो”, असे सिद्धार्थने या कार्यक्रमाबद्दल म्हटले आहे.

“या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. प्रेक्षकांचं वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायला मला आवडतं. आता होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम म्हणजे फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही तर यातल्या गोष्टींमुळे प्रेक्षकांना नवंनवीन सरप्राईज मिळणार आहेत. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपली छाप पाडणारा एक कार्यक्रम असावा. हा कार्यक्रम त्याच धाटणीचा आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रवाह परिवार या शोला वेगळ्या उंचीवर नेतो. या सगळ्यांकडून नवी ऊर्जा मिळते. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय”, असेही सिद्धार्थने म्हटले.
आणखी वाचा : अभिनेत्री मिनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारेच्या लेकीचं नाव ठरलं, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

त्यामुळे सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम नक्कीच चर्चेत असणार आहे. येत्या १० सप्टेंबर दर शनिवारी-रविवारी हा कार्यक्रम पाहता येणार आहे. रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav will host new game show aata houde dhingana star pravah nrp
First published on: 26-08-2022 at 17:29 IST