भय ही एक अशी भावना जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच मनात सुप्तपणे लपलेली असते. मग भीती ही कोणत्याही प्रकारची असून शकते. काहींना अंधाराची भीती वाटते. तर काहींना गर्दीची भीती वाटते. भीतीच्या या कचाट्यातून कोणताही व्यक्ती सुटलेला नाही. मग तो सामान्य माणूस असो किंवा एखादा सेलिब्रिटी. अशीच भीती सुबोध भावेचा मनात बसली असून तो भयभीत झाला आहे.

भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. मात्र त्याच्या आगामी भयभीत या चित्रपटातून त्याच्या भीतीचा उलगडा होणार आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सुबोधची २०२० या नवीन वर्षाची सुरुवात ‘भयभीत’ चित्रपटाने होणार आहे. आजवर भयपट साकारण्याची संधी क्वचित मिळाल्याने ‘भयभीत’ साठी सुबोध खूपच उत्सुक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


काही दिवसापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं. या पोस्टरवरुन सुबोध भावेचा ‘भयभीत’ झालेला लुक पहायला मिळतोय. अभय सिन्हा, ‘अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे. सुबोध भावे यांच्यासोबत पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदी कलावंत असणार आहेत.