मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीची क्रेझ तरुणींमध्ये पाहायला मिळते. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट आणि ‘एका लग्नाची गोष्ट’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या स्वप्नीलने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची मोहम उमटवली आहे. या चित्रपटांनंतर त्याच्या पदरात आणखी एक चित्रपट पडला असून त्याने ट्विटरवर या आगामी चित्रपटाचं पोस्ट शेअर केलं आहे.
स्वप्नीलने आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्याच्या आगामी ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचं पहिलंवहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटात स्वप्नील प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु स्वप्नीलने त्याच्या भूमिकेविषयी कोणताही खुलासा केलेला नाही.
‘पाडव्या’च्या शुभमुहूर्तावर *गणराज असोसिएट्स* सादर करत आहेत..
*मी पण सचिन*
दिग्दर्शक :- श्रेयस जाधव
१ फेब्रुवारी २०१९ ला जगभर प्रदर्शित #मीपणसचिन #1fFeb2019 #चलाखेळूया #बाप्पामोरया pic.twitter.com/L2T5UA3ljt
— Swapnil Joshi (@swwapniljoshi) November 8, 2018
दरम्यान, ‘मी पण सचिन’ हा चित्रपट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार असून श्रेयस जाधवने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. तर गणराज असोसिएट्स या चित्रपटाचे सादरकर्ते असणार आहेत.