नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून अतुल परचुरेंनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर तितक्याच उत्तम पद्धतीने अतुल परचुरे यांनी प्रत्येक भूमिका निभावली आहे. इतक्या वर्षांचं त्याचं योगदान पाहून ‘झी मराठी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळ्यात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात त्यांनी एक खास परफॉर्मन्स देखील केला आहे. याच सोहळ्यानिमित्ताने अतुल परचुरे यांनी नाटकादरम्यानचा एक मजेशीर किस्सा आहे.

‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर अतुल परचुरेंच्या किस्साचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अतुल म्हणतायत, “मला आठवतंय व्यावसायिक नाटकात तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रसंगाला सामोर जावं लागतं, हे आपल्या कल्पनेत सुद्धा नसतं. म्हणजे मी ‘नातीगोती’ नावाचं नाटक करत होतो. याला खूप वर्ष झाली. बाहेरगावी प्रयोग व्हायचे, बाहेरगावी दौरे व्हायचे. नगर किंवा कुठेतरी असा प्रयोग होता, तेव्हा तिथल्या थिएटरचा जो पडदा होता. तो माझ्या मते तीन महिने वगैरे उघडलेला नव्हता. नाटकासाठी तो उघडला गेला.”

हेही वाचा – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर ‘या’ अभिनेत्रीला म्हणायचे नाकातला केस, स्वतः किस्सा सांगत म्हणाल्या…

“तो पडदा उघडला गेल्यानंतर त्याच्यात इतके पशुपक्षी म्हणजे राणी बागमध्ये देखील एवढे पशुपक्षी नव्हते तेवढे त्या पडद्यात होते. झुरळ, पाली, डास वगैरे होते. ते साफ करून आमचा प्रयोग सुरू झाला आणि त्या प्रयोगात ‘नाणीगोती’मध्ये स्वाती चिटणीस जी माझ्या आईची भूमिका करत होती. ती साडी कपाटातून बाहेर काढते आणि नेसायला जाते, असा एक प्रसंग होता. त्यामुळे तिने साडी कपाटातून बाहेर काढली आणि त्याच्यात दोन मोठी झुरळं होती. स्वातीने ती साडी दिली फेकून ती आत निघून गेली. या झुरळांबरोबर स्टेजवर मी काम नाही करू शकत, असं सांगितलं”

“मी त्या नाटकात मतिमंद मुलाचं काम करत होतो. मी स्टेजवर बसलो होतो. ती झुरळं माझ्या दिशेने यायला लागली. मी त्या झुरळांना घाबरतो. मी माझ्या बेरिंगमध्ये कसं तरी करून झुरळांना ढकलायचा प्रयत्न करत होतो. शेवटी ती झुरळं माझ्याकडे येताना दिसली तसाच मी देखील उठून आतमध्ये गेलो. बॅकस्टेजवाल्या आमच्या सहकार्याने तिथे येऊन ती झुरळं मारली आणि पुढचा प्रयोग सुरू झाला. पण व्यावसायिक नाटकात अशा गोष्टी घडू शकतात. किंबहुना व्यावसायिकच नाही तर नाटकात अशा गोष्टी घडू शकता. त्यामुळे नाटक हे तुम्हाला नुसतं मनोरंजन देत नाही तर नाटक प्रसंगाना तोंड द्यायचं याची एक जीवंत शाळा आहे. त्यात तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकता,” असं अतुल परचुरे म्हणाले.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने केला मच्छीचा बेत, पोस्ट शेअर करत म्हणाली, “सुगरण नवरा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी नाट्य गौरव २०२४’ ७ एप्रिल, रविवारी प्रसारित होणार आहे. या सोहळ्यात नाट्यविश्वातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते आणि अनेक रंगकर्मींचा गौरव करण्यात आला. त्यामुळे नाट्यरसिकांना या सोहळ्याची उत्सुकता आहे.