scorecardresearch

MPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….

नुकतंच हेमांगीने तिच्या एका चाहत्याला फार चांगला सल्ला दिला आहे.

MPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….

आपल्या रोखठोक आणि स्पष्ट मतामुळे कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करत असते. नुकतंच हेमांगीने तिच्या एका चाहत्याला फार चांगला सल्ला दिला आहे.

हेमांगी कवीने नुकतंच फेसबुकवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने साताऱ्यातील वीर धरणाचे काही फोटो शेअर केले आहेत. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. यात ती म्हणाली, “वीर धरण! साताऱ्याच्या शिरवळ गावाजवळचं नीरा नदीवरलं ब्रिटिशकालीन धरण! Photo त दिसतंय त्याला वीर धरण backwaters म्हणतात! खुपच सुंदर आहे आणि शांत असलं तरी अफाट आहे. ह्या मार्गे गावाला जाताना इथं थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढं जाताच येत नाही. प्रत्येक वेळी खुप वेगळं वाटतं आणि खुप काही देऊन जातं. काय ते प्रत्येकाने आपआपलं अनुभवायचं! ते म्हणतात ना निसर्ग एखाद्या therapy सारखा असतो इथं आल्यावर ते १०० % जाणवतं!”
आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“हा काय picnic spot नाही, कधी होऊ ही नये हीच एक प्रार्थना. नाहीतर आहेतच पाण्याच्या कडेला chips ची पाकीटं, cold drinks च्या plastic च्या बाटल्यांचा थर आणि बरंच काही. अश्या गोष्टींना इथं बंदीच असायला हवी. इथं एकट्याने यावं, २-३ तास बसावं, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीशी, तत्वाशी संभाषण करावं, त्याला आपलंसं करावं, आपल्या आत भरून घ्यावं, शांत व्हावं आणि निघून जावं! बस!” असे हेमांगीने म्हटले.

हेमांगीच्या या पोस्टवर तिच्या एका चाहत्याने हटके कमेंट केली आहे. यावर कमेंट करताना हेमांगीचा एक चाहता म्हणाला, “उद्या माझी mpsc ची परीक्षा आहे , मला पेपर साठी तुमच्याकडून शुभेच्छा भेटल्या तर खूप बरं होईल…??” यावर हेमांगीने तिच्या स्टाइलने हटके उत्तर दिले आहे.

“बाळा इथे सोशल मीडियावरुन आशीर्वाद आणि बेस्ट लक घेऊन काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा एक महिना सोशल मीडिया बंद करुन अभ्यास कर. आता तुला शुभेच्छा देण्याऐवजी सल्लाच देऊन टाकला म्हणजे पुढच्या वेळी त्याचा उपयोग होईल”, असे हेमांगी कवीने कमेंट करताना म्हटले.

आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा

hemangi kavi

दरम्यान तिची ही कमेंट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. सध्या ती ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या