अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हिने आजवर विविधरंगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिकली आहेत. हेमांगीने मालिका, सिनेमा तसचं नाटकांच्या माध्यमातू तिचं अभिनय कौशल्य दाखवत स्वत: ओळख निर्माण केली आहे. हेमांगी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

हेमांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट अनेक व्हिडीओ शेअर करत असते. मात्र नुकतचं एका माहिलेने हेमांगीला ट्रोल केलं आहे. महिलेच्या कमेटंला हेमांगीने देखील खरपूस शब्दात उत्तर दिलं आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. मेकअप न करता तिने हा व्हीडीओ शेअर केला. या व्हीडीओवर एका महिनेले कमेंट केली आहे. ” एक्सप्रेशन आणि डान्स वैगरे ठिक आहे पण एवढी गचाळ का राहतेस ? जरा टापटीप रहा म्हणजे आम्हाला बघवेल व्हीडीओ प्लिज.” अशी कमेटं करत या महिलेने हेमांगीला ट्रोल केलं.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!

हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या ट्रोल करणाऱ्या महिलेला सडेतोड उत्तर दिलं आहे. हेमांगीने महिलेची कमेंट असलेला फोटो शेअर केला आहे. यात हेमांगी म्हणाली, “या फोटोतली कमेंट वाचा ! ही एका स्त्री ने लिहिली आहे! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण? आता कमेंटसचा भडीमार होणार, दूर्लक्ष कर सोशल मीडिया आहे. लोक बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चालली आहे. ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!” असं हेमांगीने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

(photo-facebook capture)

याआधी देखील हेमांगीने एका युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. एका युजरने हेमांगीला केमंटमध्ये म्हंटलं आहे, “पकाव व्हीडिओ टाकणे बंद करा ,स्क्रीप्ट वर किमान काम करा .. आठवड्यात दोन टाकले तरी चालेल.” यावर हेमांगी या युजरला म्हणाली, “तुम्हांला पटत नसेल तर मला block करू शकता… फालतू च्या comments टाकणं बंद करा. मी अभिनेत्री आहे.. लेखक नाही! अभिनयासाठी मी नाटक, मालिका, सिनेमांमध्ये कामं करते! ”

अभिनय क्षेत्रात काम करत असताना कलाकरांचे अनेक चाहते असतात मात्र त्यांना काही वेळा ट्रोलही व्हावं लागतं. अनेक कलाकार ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसतात.