"त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि..." घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन | marathi actress manasi naik talk about husband pradeep kharera divorce rumors nrp 97 | Loksatta

“त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

अखेर मानसी नाईकने या चर्चांवर अप्रत्यक्षरित्या मौन सोडले आहे.

Manasi Naik, Pradeep Kharera, manasi naik divorce, manasi naik reaction, manasi naik husband, manasi naik divorce filed
मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळं झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.

‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला कायम ओळखले जाते. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि प्रदीपचे एकत्र फोटोही डिलीट केले होते. त्यानंतर तिने खरेरा हे आडनावही हटवलं आहे. यामुळे ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर मानसी नाईकने या चर्चांवर अप्रत्यक्षरित्या मौन सोडले आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट करताना दिसत आहे. यातील बहुतांश पोस्ट या भावूक असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे तिचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याचे बोललं जात होतं. अखेर तिने यावर भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…” पतीच्या वाढदिवशी मानसी नाईकच्या पोस्टने वेधले लक्ष

मानसी नाईकने केलेली पोस्ट

“आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात जे तुमच्यासाठी सतत खंबीरपणे उभे राहत असतात. तुम्ही जे जसे आहात, तसे ते तुम्हाला स्वीकारतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनात तुमच्याविषयीच आदरच असतो. ते तुमच्यासाठी लढतात. तुम्हाला सहभागी करुन घेतात. तुम्हाला प्रोत्साहन देतात. काहीही झालं तरी ते तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात.

पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं अपवादाने आली की ज्यांनी मित्राचा बुरखा घेतलेला होता मात्र त्यांनी वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही.

माझ्या या कठीण काळात माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातील माहितीचा कोणी गैरवाजवी उपयोग करत असेल तर कृपया त्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही विनंती सर्वांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आहे”, असे मानसी नाईकने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा

दरम्यान मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेकांना ही स्टोरी वाचून धक्का बसला आहे. तसेच तिने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी आणि घटस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. मात्र अद्याप तिने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 21:53 IST
Next Story
“छोट्या भूमिका, मुंबईतील नोकरी अन् भाडं न भरता आल्याने…” ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव