आपल्या सर्वांची लाडकी ‘अस्मिता’ म्हणजेच मयुरी वाघ हिने या नवीन वर्षी स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याकडे लक्ष दिलं आहे. यासाठी तिने एक वेगळंच वर्कआऊट आत्मसात केलंय. ‘शोधलं की सापडतं’ असं म्हणणाऱ्या अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा मार्ग शोधला ‘झुंबा’ या अनोख्या रिदमिक वर्कआऊटमध्ये. मयुरीने यावर्षी एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला असून, तिचं हे वर्कआऊट ती खूप एन्जॉय करतेय. आज ‘वर्ल्ड हेल्थ डे’ निमित्त मयुरीने तिच्या चाहत्यांसाठी तिच्या झुंबा डान्स मूव्हजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयुरीने तिच्या चाहत्यांना एका अर्थाने इन्स्पायरच केलं आहे, कारण एका फन वर्कआऊटमधूनही आपण फिट आणि हेल्दी होऊ शकतो हे या व्हिडीओतून मयुरीने दाखवून दिलं आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे झुंबा मूव्हज नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. या व्हिडिओमध्ये मयुरी झुंबाच्या वेगवेगळ्या स्टेप्सवर डान्स करताना दिसतेय.
https://www.instagram.com/p/BSk4srhh4e2/
गेल्यावर्षी मयुरी अभिनेता पियुष रानडेसोबत विवाहबंधनात अडकली होती. या दोघांची ओळख ई-टीव्ही मराठीच्या एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. पण त्यानंतर ते अनेक दिवस भेटले नव्हते. नोव्हेंबर २०१४ मध्ये ते पुन्हा एकदा अस्मिताच्या सेटवर भेटले. अस्मिता मालिकेत त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. दोघांच्या याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टेलिव्हिजनवरील ही आवडती ‘रील लाइफ’ जोडी ‘रिअल लाइफ’ जोडी बनली.