मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तर ती फारच सक्रिय असते. विविध विषयांवर आपलं मत खुलेपणाने ती मांडताना दिसते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भाषणावरही अक्षय तृतीयेला तिने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे ती भलतीच चर्चेत आली होती. आता प्राजक्त तिच्या नव्या लूकमुळे सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ता वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसतेच. पण त्यापेक्षाही तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं नेटकरी पसंत करतात. नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने साडी नेसून फोटोशूट करत ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण प्राजक्ताने ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसली आहे. साडी नेसताना ब्लाऊज परिधान न करणं ही कसली फॅशन असा प्रश्न अनेकांना पडला. तसेच तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणाऱ्यासही सुरुवात केली.

आणखी वाचा – जिममध्ये एकत्रित वर्कआऊट करताना दिसले अनुष्का-विराट, पाहा हा VIRAL VIDEO

‘प्राजक्ता ब्लाऊज परिधान करायला विसरलीस का?’ असा प्रश्न नेटकरी तिला कमेंट्सच्या माध्यमातून विचारत आहेत. तर काही जणांनी ‘तू खूप गोड दिसत आहेस’ अशा चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत. या फोटोमध्ये तिने आसामी सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे. तसेच साडीवर लाल आणि निळ्या रंगाचं वर्क पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने परिधान केलेले दागिने विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत.

आणखी वाचा – गालावर हात फिरवला, मिठी मारली अन् म्हणाली….शहनाज-सलमानचा व्हिडीओ होतोय VIRAL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आली. या मालिकेनंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आता ती ‘हास्य जत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते. या कार्यक्रमामध्ये ती एखादा परफॉर्मन्स सुरू असताना सतत व्वा दादा व्वा म्हणत असते. तिच्या या एका वाक्यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं.