मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ता माळी ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता ही घराघरात पोहोचली. प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘कमला रायझिंग स्टार’चा पुरस्कार मिळाला आहे. या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. या फोटोला तिने छान कॅप्शनही दिले आहे. तिचे हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : हातात हात घालून एंट्री ते कपल डान्स, ‘असा’ पार पडला राणादा आणि अंजलीबाईंचा साखरपुडा

प्राजक्ता माळीची फेसबुक पोस्ट

“आणि कालच्या शुभमुहूर्तावर “मुंबई- राजभवनात” जाण्याचा योग आला…

काल महाराष्ट्राचे राज्यपाल – मा. श्री. भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते “Kamala Rising Star” पुरस्कार मिळाला..
मनापासून धन्यवाद, आयोजन समिती व मा. राज्यपाल.

अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी,शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, आकाश ठोसर इ. माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद..

प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार. असच प्रेम राहू द्या.

(आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईने आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं). #कृतज्ञ #महाराष्ट्र #सह्याद्रिचीलेक”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शुभमंगल सावधान! अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी- शिवानी अडकले विवाहबंधनात

दरम्यान प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं. या मालिकांपासून सुरु झालेला प्राजक्ताचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.