अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तर ती विविध व्हिडीओ शेअर करत असते. मेकअपबद्दल टिप्स, एखादा दिवसभरात घडणारा प्रसंग. घरगुती गप्पा-गोष्टी असे अनेक क्रांतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. क्रांती तसेच तिचे पती अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे नेहमीच चर्चेत असतात. क्रांतीने आता देखील समीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

क्रांतीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर फुग्याशी खेळताना दिसत आहेत. तसेच खेळून झाल्यानंतर लगेचच समीर लॅपटॉपवर अगदी मन लावून काम करताना दिसत आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी समीर कशाप्रकारे जबाबदारीने सांभाळू शकतात याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. “मी नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात.” असं क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

आणखी वाचा – “योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत

समीर यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. “तुम्ही तर रिअल हिरो आहात”, “आम्हाला तुमचा अभिमान आहे” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. क्रांती-समीर या मराठमोळ्या जोडप्याला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळताना दिसते. शिवाय क्रांती पतीवर आपलं किती प्रेम आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगताना दिसते.

आणखी वाचा – ४ कोटी रुपयांचं घड्याळ, चार्टर विमान अन् बरंच काही, ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र प्रत्येक प्रसंगांना ते हिंमतीने सामोरे गेले. क्रांती देखील आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आता तर सोशल मीडियावर समीर यांच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे.