कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून स्पर्धक एकजुटीने राहण्याचा प्रयत्न करत आहेत. १५ एप्रिलपासून हा प्रवास सूरु झाला आज या खेळाचा दुसरा दिवस. अवघ्या दोन दिवसातच घरामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. अनेक विषयांवरून स्पर्धकांमध्ये मतभेद होतात, भांडण होतात. तरीदेखील हे सगळे स्पर्धक एकत्र बसून स्वयंपाक करतात, घराची साफ सफाई करतात.

या सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी मैत्री झाल्याचे दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये येऊन आता दोनच दिवस झाले आहेत आणि स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या या घरामध्ये सासूबाई आणि पिंकी पिंगळे यांची धम्माल मस्ती सुरु आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल सासुबाई आणि पिंकी पिंगळे कोण? तर घरातील स्पर्धकांनी घरातील दोन सुंदर मुलींना म्हणजेच रेशम टिपणीस आणि मेघा धाडे यांना अनुक्रमे सासूबाई आणि पिंकी पिंगळे अशी नावे ठेवली आहेत.

मेघा धाडे पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, मला घरातील कामे करायला आणि स्वयंपाक घर आवरायला तसेच वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडते. किचनमधील कामे तसेच घराची आवरासावर करताना मेघा बऱ्याचदा प्रेक्षकांना दिसणार आहे. किचनची कामे करताना गाणी म्हणणे, काम करत असताना डांस करणे हे मेघाचे सुरु असते. मेघाच्या जोडीला तिच्यासोबत असतात सई आणि स्मिता या तिघींची मिळून किचनमध्ये धम्माल मस्ती सुरु असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेघाच्या गुलाबी रंगाच्या आवडीमुळे तिला घरच्यांनी पिंकी पिंगळे हे नाव दिले आहे. तर रेशम टिपणीसला घरच्यांनी सासूबाई हे नाव ठेवले आहे. तसेच आरती, उषा नाडकर्णी आणि रेशम टिपणीस यांनी आपल्या मराठमोळ्या मुलींना बॉलीवूडच्या अभिनेत्रींची नावे दिली आहेत. स्मिता गोंदणकरला प्रियांका चोप्रा, सई लोकूरला कतरिना कैफ आणि मेघा धाडेलाच दुसरं नाव मिळालं आहे ते म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन!