बाला चॅलेंज, योगा चॅलेंज, किकी, डेले अॅली, वॉट दि फ्लफ, बॉटल कॅप, आइस बकेट, १० इयर्स चॅलेंज अशा काहीशा विचित्र पण मजेदार आव्हानांनी गेल्या काही काळात सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. अगदी सर्व सामान्यांपासून हॉलिवूड, बॉलिवूड पर्यंतच्या जवळपास सर्व कलाकार मंडळींनी हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता ही चॅलेंज जुनी झाली, आता एक नवीनच आव्हान सोशल मीडियावर चर्चेत आहे. याला ‘फोमो चॅलेंज’ असे म्हणतात. गंमतीशीर बाब म्हणजे मराठी कलाकारांनी देखील हिरीरीने या आव्हानात भाग घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. डॅन हर्मन यांनी १९९६ साली फोमो ( FOMO ) या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा शोध लावला. या शब्दाचा फुल फॉर्म ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ ( Fear of Misisng out ) असा आहे. म्हणजेच सतत काहीतरी हरवल्याची भिती. सर्वात प्रथम २०१५ साली ‘फोमो चॅलेंज’ चर्चेत आले. त्यानंतर इतर आव्हानांच्या गर्दीत ते हरवून गेले. परंतु आता पुन्हा एकदा मराठी कलाकारांमुळे या चॅलेंजचा ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे.

अमेय वाघ, रसिका सुनिल, ऋतुजा बागवे, पर्ण पेठे, अभिषेक देशमुख, सिद्धार्थ चांदेकर, संजय जाधव अशा अनेक कलाकारांनी यात भाग घेतला आहे. त्यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर आपले अनुभव सांगितले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi celebrities take fomo challenge on social media mppg
First published on: 03-11-2019 at 19:07 IST