Holi 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली ‘स्पेशल’ रंगपंचमी

रवीसोबत या मुलांनी रंगपंचमीचा चांगलाच आनंद लुटल्याचं दिसून येत आहे.

होळी म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण. या दिवशी प्रत्येकाच्या घरात उत्साहाचं वातावरण पसरलं असते. होळीची पुजा झाल्यानंतर साऱ्यांना वेध लागतात ते रंगपंचमीचे. रंगपंचमी म्हटलं की सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण पसरलं असतं. काही ठिकाणी खास होळी पार्टीचं आयोजनही करण्यात येतं. आपण सारेच जण हा दिवस आपल्या कुटुंबियांसोबत सेलिब्रेट करत असतो. मात्र मराठी अभिनेता, दिग्दर्शक रवी जाधवने त्याची यंदाची रंगपंचमी ‘स्पेशल’ सेलिब्रेट केली आहे.

रवी जाधवने यंदाची रंगपंचमी मित्रपरिवारासोबत सेलिब्रेट न करता ठाण्यातील आपल्या स्पेशल मित्रांसोबत साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यातील जिद्द या शाळेतील स्पेशल चाईल्डसोबत रवीने यंदा रंग खेळले आहेत. या रंगपंचमीचे काही फोटोही रवीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत असलेली मुलं रंगपंचमीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. कोणी लाल, हिरव्या, पिवळ्या रंगात रंगलं आहे. तर कोणी आनंदाच्या रंगात न्हाऊन निघालं आहे. त्यामुळे रवीसोबत या मुलांनी रंगपंचमीचा चांगलाच आनंद लुटल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

सध्या रवीचे हे फोटो व्हायरल होत असून त्याने “अस्सल निरागस हसणे केवळ इथे पहायला मिळते. आमची ठाण्यातील ‘जिद्द’ शाळेतील ‘स्पेशल’ रंगपंचमी.कारण आपण सगळेच ‘स्पेशल’ आहोत!!!” , असं कॅप्शन रवीने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, रवीच्या या उपक्रमामुळे सध्या त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. रवी जाधव मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव असून त्याने काही गाजलेल्या चित्रपटांच दिग्दर्शन केलं आहे. त्याचा न्यूड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi celebrity ravi jadhav holi celebration with special child

ताज्या बातम्या