मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलीवूड चित्रपटांवरही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सुडोल बांधा, उंची आणि मनमोहक चेहऱ्याच्या पूजाचे लाखो चाहते आहेत. पूजा तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेसाठीही ओळखली जाते. मात्र, एकेकाळी पूजाचं वजन खूप जास्त होतं. या वजनामुळे अनेकदा तिला टोमणेही खावे लागले आहेत. लहानपणी तिच बघूनघरच्यांनी तिला टोपणनाव दिलं होतं. एका मुलाखतीत पूजाने यामागचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “तुम्ही खाल्लेला विचित्र पदार्थ कोणता?”, अतुल कुलकर्णी म्हणाले, “बेडकाचे पाय अन्…”

सध्या पूजा फिट दिसत असली तरी लहानपणी ती खूप जाड होती. ज्यावेळी पूजाचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन साडेहदा पाऊंड होतं. त्या वर्षात सगळ्यात हेल्दी बाळ म्हणून पूजा रकॉर्डसुद्धा आहे. त्यानंतर तिचं वजन वाढतच गेलं. म्हणून तिला घरात कुणी उचलून घ्यायचं नाही. एकदिवस तिचा मामा पूजाकडे बघत तिच्या आईला म्हणाला ‘हा काय बोजा आहे?’ त्यानंतर पूजाला बोजा असं टोपणनाव पडलं. ते नाव आता बदलून ‘बोजू’ असं झालं आहे.

पूजा शेवटची ‘दगडी चाळ २’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात पूजाबरोबर अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचा पहिला भागही चांगलाचा गाजला होता. सध्या पूजा तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे.