मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया सध्या ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘वेड’ चित्रपटातून जिनिलीयाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. त्यांचा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. रितेश व जिनिलीयाची जोडी जवळपास २० वर्षांनी स्क्रीनवर पुन्हा पाहायला मिळाली. रितेश आणि जिनिलीयाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि तिथून त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. पण जिनिलीया रितेशला भेटल्यावर तिचं त्याच्याबद्दलचं मत चांगलं नव्हतं.

“विमानात माझ्यासमोर एक मुलगी…” रितेशने सांगितला स्वतःच्याच फजितीचा मजेदार किस्सा

Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

एका चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जिनिलीयाची ओळख झाली पण दोघांमध्ये मैत्री व्हायलाही बराच वेळ लागला. २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी रितेशबद्दल जिनिलियाचं मत चांगलं नव्हतं. कारण, तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता. त्यामुळे गर्विष्ठ असेल, असं तिला वाटलं होतं. त्यामुळे पहिल्या भेटीतच जिनिलीयाने रितेशकडे दुर्लक्ष केलं होतं आणि रितेशला तिचं हे वागणं पटलं नव्हतं. त्यावेळी जिनिलीया १६ वर्षांची तर, रितेश २४ वर्षांचा होता.

“मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची हैदराबाद विमानतळावर भेट झाली. या भेटीमध्ये जिनिलीया रितेशच्या आधीच येऊन थांबली होती. विशेष म्हणजे ही गोष्ट रितेशला माहितदेखील होती. त्यातच रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे त्याच्याच थोडाफार अहंकार असणार असं जिनिलीयाला वाटलं होतं. त्यामुळे त्याने अ‍ॅटीट्यूड दाखवण्यापूर्वीच तिने त्याला अ‍ॅटीट्यूड दाखवायला सुरुवात केली. रितेशने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर जिनिलीयाने त्याच्याशी हात मिळविला. मात्र तिचं लक्ष इकडे-तिकडेच होतं. खरंतर जिनिलीयाचं हे वागणं रितेशला काही पटलं नव्हतं. परंतु चित्रपटामुळे ते जसंजसं एकमेकांला समजू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही समजलं नाही.

“आम्ही दोघंही सिगरेट व दारू…” मुलांनी विचारलेल्या प्रश्नावर रितेश देशमुखने दिलेलं उत्तर, स्वतःच सांगितला किस्सा

बऱ्याच वेळा हे दोघं त्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा करायचे. जिनिलीया रितेशला कायम आर्किटेक्चरबद्दल काही ना काही सांगत राहायची. मात्र या दोघांचं नात लग्नापर्यंत पोहोचेल याची कल्पना या दोघांनाही नव्हती. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर रितेश ज्यावेळी घरी परत आला तेव्हा त्याला सतत जिनिलीयाची आठवण येत होती. मात्र एखाद्या मुलीला लगेच फोन करणं योग्य नसल्याचं म्हणत तो तिला फोन करायचं टाळत होता. दुसरीकडे जिनिलीयालादेखील रितेशची आठवण येत होती. परंतु हेच प्रेम आहे याची जाणीव त्यांना त्यावेळी झाली नव्हती.

‘तुझे मेरी कसम’नंतर या दोघांनी ‘मस्ती’ या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केलं. त्यानंतर मात्र याचं नातं अधिक खुललं आणि तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. रितेश जिनिलीया एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. दोघांना रियान आणि राहील नावाची दोन मुलंही आहेत.