Kranti Redkar Video: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे-मोठे प्रसंग, मजेशीर किस्से व तिच्या जुळ्या मुलींनी केलेल्या करामती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने चार्जरचा विसरल्याचा किस्सा सांगितला आहे.

व्हिडीओमध्ये क्रांती म्हणाली, “माझ्या फोनचा चार्जर आईच्या घरी राहिला. मी तिला सांगितलं की मी कुरिअर बूक करते, तू तो चार्जर पाठव. तो चार्जर महाग आहे, ४-५ हजारांचा असतो तर जरा नीट पाठव. तर आईने काय केलं ते पाहा.” या व्हिडीओत नंतर तिच्या आईने पाठवलेलं कुरिअर दाखवलं. तिच्या आईने जेवणाच्या पिशवीत सर्वात वरती एक रिकामा डबा ठेवला होता, त्याखाली आणखी एक लहान पिशवी, त्यात जेवण वाटेल असा पॅक केलेला एक रिकामा डबा आणि त्याखाली एक प्लास्टिकचा डबा, ज्यात चार्जर ठेवलेला होता.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

पुढे क्रांती म्हणाली, “तिला मी डबा नीट पाठव म्हटल्यावर तिने सामान असं पाठवलं जसं की त्या पिशवीत जेवण आहे असं वाटेल. तिने ज्या पद्धतीने सामान पाठवलं ते पाहून कोणताच इंटेलिजन्स ऑफिसर पकडू शकणार नाही, असं आईने पाठवलं.” हा व्हिडीओ शेअर करताना क्रांतीने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. “ती डिलिव्हरी करणाऱ्याला म्हणाली, जेवण गरम आहे नीट घेऊन जा,” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.

पाहा व्हिडीओ –

Bigg Boss Marathi : जान्हवी अन् आर्या एकमेकींना भिडल्या, जोरदार भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी, पाहा प्रोमो

क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींना तर आईने ज्या पद्धतीने चार्जर पाठवला ते बघून हसू आवरत नाहीये. ‘सिक्युरिटी प्रो मॅक्स’, ‘वाह वाह समीर सरांनी पण सासू बाईंच्या आयडियाची दाद दिली असेल,’ ‘नशीब पासवर्ड नाही ठेवला…”लाल गुलाब-काला गुलाब” …”रॉबर्ट, आज एक इम्पॉर्टंट कन्साईंटमेंट येणार आहे, किसिको कानोकान खबर नहीं होनी चाहिए!” ‘समीर वानखेडे यांच्या सासूबाई आहेत…’, ‘४-५ हजार म्हटलं ना… मग तिला तिच्या मुलीने मेहनतीने कमावलेल्या पैशांची काळजी घ्यावीच लागणार. निरागसता असलेली ही शेवटची पिढी आहे…’ , ‘सगळे ऑफिसर तुमच्याकडेच आहेत,’ ‘आई आई असते…’ अशा कमेंट्स क्रांतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kranti redkar video comments
क्रांती रेडकरच्या व्हिडीओवरील कमेंट्स

मधुराणी प्रभुलकर व समृद्धी केळकर यांनीही क्रांतीच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी यावर हसणाऱ्या इमोजी कमेंट केल्या आहेत. महागड्या चार्जरसाठी आईने शक्कल लढवल्याचा क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.