सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल भाष्य केले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे. तर या चित्रपटात सना शिंदे ही शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्राजक्ता माळीने हा चित्रपट पाहिला आहे. त्यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

प्राजक्ता माळीची पोस्ट

“ठरल्याप्रमाणे मी “महाराष्ट्र दिन” ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट बघून साजरा केला…

मी चित्रपट पाहिला; तुम्ही पाहिलात का?
नसेल पाहिला तर आजच्या दिनी जुळून आलेला हा योग चुकवू नका.

अंकुश दादांच अप्रतिम काम, केदार सरांचं फार भारी दिग्दर्शन, सनाचा निरागसपणा, निर्मिती ताई- शुभागीचं रागावणं आणि अजय-अतूल दादांची गाणी… तुमचं मन जिंकून जातात…”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर प्राजक्ता माळीच्या भाचीने ठरला ठेका, म्हणाली “नाच येत नसेल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.