scorecardresearch

Premium

Video भररस्त्यात का नाचली सई ताम्हणकर? व्हिडिओ व्हायरल

सई ताम्हणकरचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

sai thamankar
भर रस्त्यात गाडी थांबवून नाचली सई ताम्हणकर

सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने सई नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सई प्रंचड सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान सईच्या एका व्हिडीने सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घातला आहे.

हेही वाचा- Video : “दोघी सारख्याच दिसता…”, किशोरी गोडबोले लेकीसह खेळल्या गरबा, मराठी कलाकारांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..
enjoy every moment death is unexpected quote written on back of auto rickshaw video goes viral
रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिले असे की Video पाहून युजर्स म्हणाले, “बरोबर बोललास भावा…”
kids dance video
“…इत्ता सा टुकडा चाँद का”; चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहाच, डान्स व्हिडीओ व्हायरल
hats off to the creativity a perfect car made of stones netizens speechless after seeing this viral video
पठ्ठ्याच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! चक्क दगडांपासून बनवली हुबेहूब कार, VIDEO पाहून युजर्स अवाक्

सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भर रसत्यात उभ्या असलेल्या गाडीत बेभानपणे नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सईने लिहिलं. “मी चांगला टेक दिल्यानंतर सेलिब्रेट करताना” शुटींगदरम्यान सईचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर सईच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत सईने स्वत:च घर खरेदी केलं होतं. सईने तिच्या युट्यूबवर आपल्या नव्या आलिशान घऱाचा व्हिडीओ शेअर केला होता. मुंबईत आल्यानंतर सईने १० वेळा आपलं घर बदललं आहे. त्यामुळे तिने आपल्या नव्या घराला ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.

हेही वाचा- “भारतातील पहिला एक्सप्रेस वे अन् त्यासाठीची धडपड…”, बहुचर्चित ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाळासाहेब ठाकरेंचीही दिसली झलक

सईच्या कमाबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत सईने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’. ‘बालक-पालक’, ‘क्लासमेट्स’, ‘दुनियादारी’ सारख्या मराठी चित्रपटांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही सईने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘हंटर’ ‘मीमी’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्येही सईने महत्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सई टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परिक्षकाची भूमिका बजावत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sai tamhankar dance on road video viral on social media dpj

First published on: 17-10-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×