scorecardresearch

Video : मतभेद, मैत्री, काही वर्ष अफेअर, आठ वर्षांचा संसार अन्…; स्पृहा जोशीच्या नवऱ्याला पहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मजेशीर व्हिडीओ

स्पृहा जोशीने पती वरदबरोबरचा खास व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. याचीच एक झलक पाहूया.

Video : मतभेद, मैत्री, काही वर्ष अफेअर, आठ वर्षांचा संसार अन्…; स्पृहा जोशीच्या नवऱ्याला पहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मजेशीर व्हिडीओ
स्पृहा जोशीने पती वरदबरोबरचा खास व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. याचीच एक झलक पाहूया.

अभिनेत्री स्पृहा जोशीने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. उत्तम सुत्रसंचालक म्हणूनही ती नावारुपाला आली. कामामुळे सतत चर्चेत असणारी स्पृहा तिच्या पतीबाबत मात्र फार कमी बोलताना दिसते. स्पृहा व पती वरद लघाटेचे एकत्रित फोटोही कुठेच दिसत नाहीत. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये तिचं व वरदचं नातं किती घट्ट आहे हे तिने सांगितलं होतं. आता तर चक्क वरदबरोबरचे काही व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : चित्रीकरण सोडून प्रसाद ओकवर घरातील लादी पुसण्याची आली वेळ, बायकोने राग देताच पुढे काय घडलं पाहा?

काही दिवसांपूर्वीच स्पृहाच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त तिने नवऱ्याबाबत प्रेम व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला. पहिल्यांदाच स्पृहा तिच्या नवऱ्याबाबत खुलेपणाने व्यक्त होताना दिसली. आताही तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

स्पृहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघंही लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये मनसोक्त फिरत स्पृहाने नवऱ्यासह स्पेशल दिवस साजरा केला. महागड्या हॉटेलमध्ये जेवण केलं. इतकंच नव्हे तर दोघं लहान होऊन खेळले.

स्पृहा व वरद गेम झोनमध्ये गेले. तिथे दोघंही मनसोक्त खेळले. तसेच वरळी सि-लिंकची झलकही त्यांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कॉलेजमध्ये असताना स्पृहा व वरद एकमेकांना भेटले. आधी या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. मात्र त्यानंतर या दोघांच्या नात्याचं रुपांतर मैत्री व प्रेमात झालं. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर स्पृहाने नवऱ्याबरोबरचा धमाल व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 17:51 IST

संबंधित बातम्या