मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनयाची छाप पाडणाऱ्या अमोल कोल्हेंना प्रेक्षकांनी ऐतिहासिक भूमिकेत विशेष पसंती दिली. त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो अथवा संभाजी महाराज असो. या भूमिकांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.

अमोल कोल्हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे काही डायलॉग म्हणताना दिसत आहेत. “हा शिवपुत्र संभाजी. या सह्याद्री पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. इथल्या पाण्याच्या थेंबथेंबात अन् मातीच्या कणाकणांत मिसळलेला सळसळत्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनात धगधगता ठेवा”, असे डायलॉग अमोल कोल्हे व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा>> दुसऱ्यांदा आई झालेल्या देबिना बॅनर्जीने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, म्हणाली…

हेही वाचा>> Video: भारती सिंगसह राकेश रोशन यांचा रोमॅंटिक गाण्यावर डान्स, हृतिक रोशन व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अमोल कोल्हेंचे हे डायलॉग एका नाटकातील आहेत. ‘शिवपुत्र संभाजी’ हे नाटक घेऊन अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. संभाजीनगरमध्ये या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. याच संदर्भातील पोस्ट अमोल कोल्हेंनी शेअर केली आहे. “पुन्हा तोच झंझावात ’शिवपुत्र संभाजी’ महानाट्य. दिनांक २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर, संभाजीनगर…तिकीट विक्री १ डिसेंबरपासून”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘गलवान’चा उल्लेख करत रिचा चड्ढाने केलं ट्वीट, नेटकऱ्यांची fukrey3 बॉयकॉट करण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकांमधून अमोल कोल्हे घराघरात पोहोचले. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.