आजकाल सोशल मीडियावर ९०च्या दशकातील मराठमोळ एक लोकप्रिय कपल नेहमी चर्चेत असतं. हे कपल म्हणजे नारकर कपल. अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांच्या मनोरंजनसाठी शेअर करत असतात. पण यामुळे ते कधीकधी ट्रोलही होतात. मात्र याला दोघंही सडेतोड उत्तर देतात. नुकताच त्यांनी एका नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामधील त्यांनी एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे.

हेही वाचा – “‘रंग माझा वेगळा’ संपल्यानंतर …” अभिनेत्री रेश्मा शिंदे झाली भावुक, म्हणाली, “‘ही’ गोष्ट कायम…”

ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्याबरोबरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अविनाश आणि ऐश्वर्या दोघंही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी छान कॅप्शन लिहिलं आहे. “हे सर्व लहानशा गोष्टींबद्दल आहे. तुम्ही कोण आहात?, तुम्ही काय करतात? याचा काही फरक पडत नाही. पण तुमच्या जीवनात आनंदी होण्याची १०० पेक्षा जास्त कारणे आहेत. प्रत्येक दिवस घडलेल्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये मोडा. जीवन आनंदाने साजरे करा.”

हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…

हेही वाचा – Video: “समोरचा मेला तरी कोणी…”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत; चाळ संस्कृतीविषयी केलं भाष्य

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच कलाकार मंडळींनी देखील प्रतिक्रिया केल्या आहेत. अभिनेत्री तितीक्षा तावडेने ‘वेडे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “या जगात नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही, म्हणून आपण आपली हौस, इच्छा का मारायच्या? तुमच्याकडे पाहून आयुष्याला प्रेरणा मिळतेय. काही ठिकाणी लग्न होऊन अवघ्या महिनाभरात संसार मोडणारे कपल आणि आयुष्याच्या सर्वकाळ असं आनंदात जगणार कपल. यात खूप फरक आहे. असंच आनंदी जीवन जगालं तर जिवंत असण्याला किंमत आहे आणि तेच खरे जीवन आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “मी या दोघांनाही कधीच वय विचारणार नाही. एकदम जॉली, गूड कपल आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा, असेच तरतरीत राहा.”

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित; गायकांचं ‘सारेगमप’शी आहे खास कनेक्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच त्या ‘स्टार प्लस’वरील नवी हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत.