‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र क्रेझ सुरु आहे. प्रत्येक घराघरात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील गाणी, डायलॉगही हिट झाले आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुकन्या मोने या साधना काकडे हे पात्र साकारत आहे. नुकतंच सुकन्या मोने यांच्या पात्राबद्दलचा एक किस्सा समोर आला आहे.

बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या शेवटी ‘मंगळागौर’ हे गाणं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच गाजताना दिसत आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र हिने गायलं आहे. नुकतंच तिने या गाण्याबद्दल एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

“या चित्रपटात सुकन्या मावशीच्या बॅकग्राऊंडला एक गाणं गायचं होतं आणि तेव्हा मला पियुषचा फोन आला. पियुष म्हणाला, ‘सावनी तू आताच्या आता मला हे गाण रेकॉर्ड करुन पाठवशील का?’ त्यावेळी पहिलं लॉकडाऊन होतं आणि मी तेव्हा गरोदर होते. त्यावेळी पियुषने ‘मला आताच्या आता हे गाणं गाऊन पाठवं. त्या सीनचं शूटींग सुरु आहे.’ त्यावेळी मी त्याला म्हटलं, ‘अरे पियुष मला आता श्वास घ्यायलाही जमत नाही. माझी या आठवड्यात डिलिव्हरी आहे.’

त्यावेळी तो म्हणाला,’तू आता ज्या पोझिशनमध्ये आहेस ना, मला तसंच हवंय. कारण तीच या पात्राची गरज आहे.’ त्यावेळी मी त्या परिस्थितीत फोनमध्ये ते गाणं रेकॉर्ड करुन पाठवलं. तेव्हा मी कुठेही स्टुडिओमध्ये गेली नाही. कारण तेव्हा लॉकडाऊन होतं”, असा किस्सा सावनीने सांगितला.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावनीने रेकॉर्ड केलेलं हे गाणं चित्रपटात सुकन्या मोने यांच्या बॅकग्राऊंडला वाजताना दिसत आहे. साधना ही नव्याने गायला लागलीय. तिचा आवाज फुटतो आणि ती आता दबकत दबकत परत गाते, असे त्या सीनवेळी दाखवण्यात आलं आहे. त्या गाण्यासाठी सावनीने गरोदर असताना रेकॉर्डिंग केले होते.