‘धर्मवीर’ या चित्रपटाची निर्मितीची धुरा अभिनेते मंगेश देसाई यांनी सांभाळली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय हा चित्रपट करत असताना मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा होता. आज एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. याचनिमित्त मंगेश देसाई यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – राखी सावंतने नवऱ्यावर केलेल्या आरोपांबाबत आदिल खानच्या वकिलांचा मोठा खुलासा, म्हणाले, “प्लॅन करुन…”
काय म्हणाले मंगेश देसाई?
मंगेश देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी एक किस्साही सांगितला. मंगेश देसाई म्हणाले, “साहेब तुमच्या विषयी काय लिहू? किती लिहू! शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत आणि त्या शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाहीत.”
“आज एक प्रसंग आठवतो. २००९ साली तुमच्या वाढदिवसाला मी शुभेच्छाचा फोन केला होता. यावेळी एक भावना व्यक्त केली होती की, “तुम्ही मुख्यमंत्री व्हावं”. तुम्ही हसला होतात. आणि “हे कसं शक्य आहे मंगेश?” असं म्हणाला होतात. पण माझ्या सारख्या अनेक लोकांनी हीच भावना देवाजवळ मनापासून बोलून दाखवली असणार आणि देवाने ती साठवून ठेवली असणार.”
पुढे ते म्हणाले, “तुम्ही मुख्यमंत्री झालात. जनतेचे आवडते झाला आहात. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा वाढदिवस. या पुढील प्रत्येक वाढदिवस तुमच्या आयुष्यात नवनवीन शक्ती देणारा ठरो हिच देवाकडे प्रार्थना. तब्येतीची काळजी घ्या. कामाबरोबर आराम पण करा आणि शक्तिशाली व्हा”. मंगेश देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना वाढिदवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.