‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्यात ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली.

पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे पुरविले आहेत. ‘सीबीएफसी’च्या पॅनेलवर अनेक तज्ज्ञ, इतिहासकारही असतात. हे सगळं तपासूनच चित्रपटाला मान्यता दिली गेली आहे. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे”.

aai kuthe kay karte fame Radhika Deshpande shared review of Swargandharva Sudhir Phadke movie
“समुद्राच्या खोल गहिऱ्या तळाशी घेऊन जाणारा प्रवास”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचं केलं कौतुक
nach ga ghuma swargandharva sudhir phadke
‘नाच गं घुमा’ व ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ यांच्यातील टक्कर टाळता आली असती का? दिग्दर्शक म्हणाले, “स्पर्धा हा विषयच नाही…”
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!

ठाण्यात विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करण्यात आला होता. यावरही अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. “चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडले गेले. अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. हा घडलेला प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आहे. एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:ला भक्त म्हणवतो. तर दुसरीकडे त्यांचेच विचार समजून न घेता शिवीगाळ, मारहाण करत असू तर आपल्याला हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचा आहे”, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

हेही वाचा >> ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील उत्कर्षच्या लूकचे पोस्टर शेअर करत आदर्श शिंदे म्हणाला, “तू दिवस-रात्र…”

‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवर चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा आक्षेप घेतला जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अभिजीत देशपांडे म्हणाले “आमच्या टीमकडून याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. आक्षेप घेतलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, ऐतिहासिक संदर्भ याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल”.

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका साकरली असून शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत आहे. मराठीसह तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.