प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विशाखा सुभेदारबरोबर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, यांसारखी दिग्गज स्टारकास्ट दिसणार आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गाणं एका नव्या ढंगात सादर केलं आहे. हा गाण्याला प्रेक्षकांचीही पसंती मिळताना दिसत आहे. या गीतातून चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाज पहायला मिळत आहे. हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे. मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहन यांचं संगीत लाभलं आहे. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. या चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगमकडे आहेत.
आणखी वाचा : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसाठी अश्विनी महांगडे मिळालेला नकार अन् त्यानंतर…; दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
आणखी वाचा : “आपण ८ वर्षांपूर्वी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंडची पोस्ट, म्हणाली…
दरम्यान २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.